भेंडवडे शाळेत 'शिक्षक दिन' साजरा
दि ५ सप्टेंबर २०२४
येथे काल पाच सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सौ शोभा काटकर यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थीयांनी शिक्षकांची भूमिका बजावली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खालच्या वर्गांना जाऊन लहान विद्यार्थ्यांचा समोर वर्ग घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता.
सायंकाळी पुन्हा शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले व शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. अशाप्रकारे 'शिक्षक दिन' भेंडवडे शाळेत अतिशय उत्साहाने साजरा झाला.



0 टिप्पण्या