भेंडवडे शाळेत 'आनंददायी शनिवार उपक्रमातंर्गत' राखी बनवणे उपक्रम
विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा.त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा, आत्मविश्वास वाढावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी.विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचबरोबर आपली संस्कृतीही जोपासली जावी या उद्देशाने विद्यामंदिर भेंडवडे येथे शनिवार दि १७ आॉगष्ट २०२४ रोजी ३ री ते ८ वी विद्यार्थासाठी रक्षाबंधन सणासाठी राखी बनवणे, पंतग तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला. याला विदयार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.राखी,पतंग बनवताना विदयार्थ्यांंचा उत्साह आोसंडुन वाहत होता.
सौ गायकवाड,सौ भालदार,सौ पाटोळे मॅडम, सौ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः राखी व पतंग तयार केले. मा.मुख्याध्यापिका सौ.शोभा काटकर मॅडम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना कार्यानुभव या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण पूरक संस्कृती जपण्याचा संदेश दिला. स्वतः राखी व पतंग तयार करणे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळाला.





0 टिप्पण्या