भेंडवडे शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात




दि २६ ऑगस्ट २०२४
भेंडवडे येथील शाळेत श्री कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत शाळेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भेंडवडे शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात

भेंडवडे शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात

यावेळी आकर्षक अशा राधा कृष्णाच्या वेशभूषेमधील विद्यार्थी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. शाळेच्या प्रांगणामध्ये दहीहंडी बांधण्यात आली होती.सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी गोविंदाच्या गाण्यावर नृत्य केले. शाळेतील वातावरण "गोविंदा आला रे आला" या नादघोषाने दणाणून गेले.बालगोविंदांनी ही दहीहंडी फोडून हा आनंदाचा उत्सव साजरा केला.अतिशय उत्साहाने सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी काल्याचा प्रसाद देण्यात आला.
भेंडवडे शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात

भेंडवडे शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापिका सौ शोभा काटकर यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेचे अध्यापक, अध्यापिका,पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

विडीओ
======