भेंडवडे शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा
आज दि १५ आॉगष्ट २०२४
आज आपला भारत देश ७८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.आपल्या 'विद्यामंदिर भेंडवडे' येथे सुध्दा हा कार्यक्रम मोठ्या हर्षउल्हासात साजरा झाला.
सकाळी ७:३० वाजता प्रमुख पाहुणे भेंडवडे ग्रा.प. सरपंच सौ स्नेहलताई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर ग्रामपंचायत भेंडवडे कार्यालयासमोर प्रागंणात ध्वजारोहण करण्यात आले.मुख्याद्यापक सौ शोभा काटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यानी भाषणे करून,देशभक्तीपर गीते म्हणून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,पालक व भेंडवडे गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या