आनंददायी शनिवार उपक्रम साजरा
शनिवार दिनांक १३/७/२०२४ रोजी" आनंददायी शनिवार" उपक्रमांतर्गत विद्यामंदिर भेंडवडे शाळेतर्फे लघुउद्योगाना भेट दिली.
यावेळी भेंडवडे गावातील कुंभार व्यावसायिकांच्या लघुउद्योगास विद्यार्थीयांनी भेट दिली व व्यवसायाची माहिती घेतली.
मातीतुन कलाकृती तयार करणारया कुंभार व्यावसायिकाबद्दल लहान मुलांच्या मनात प्रचंड कुतूहल असते.गौरी गणपती कसा तयार करतात? त्यास रंगरंगोटी कशी केली जाते? हे कुतुहल जनक प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यावसायिक श्री कुंभार यांनी दिली .
गणपती तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना या संकल्पना समजण्यास मदत झाली .विद्यार्थ्यांना या विषयाची आवड निर्माण करण्यास या उपक्रमामुळे नक्कीच मदत होईल.या दिवशी विद्यार्थ्यांनी क्ले माती पासून विविध वस्तू बनवणे,घोटीव कागदापासून आकर्षक वस्तू बनवणे ,मैदानी खेळ इत्यादीचा आनंद लुटला. मुख्याध्यापिका सौ. काटकर मॅडम व सौ गायकवाड मॅडम,सौ देसाई मॅडम, सौ भालदार मॅडम, श्री जाधव सर, श्री सुर्यवंशी सर यांनी आभार मानले.
या उपक्रमाला सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.








0 टिप्पण्या