शाळा परिसरात अवतरला आषाढी एकादशी दिंडी सोहळा !
शाळेमध्ये १८ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.या उपक्रमा पाठीमागे विद्यार्थ्यावर या उपक्रमांचे संस्कार व्हावे व कामाचा अनुभव प्राप्त व्हावा हा असतो.
भेंडवडे शाळा विविध उपक्रमासाठी नेहमी अग्रेसर असते. हे उपक्रम विविध विषयासंबंधीत व विविध विभागाशी संबंधित असतात. येथील विद्यार्थी व पालक या उपक्रमांना नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात.
उपक्रम ज्या प्रकारचा असतो. त्याशी अनुरूप विद्यार्थ्यांची तयारी करून मुलांना शाळेत पाठवत असतात. आषाढी एकादशी दिंडी सोहळ्यांसाठी पालकानी आपल्या पाल्याची योग्य तयारी केलेली होती. कुणी विठ्ठल बनून आलेले होते, कुणी रुक्मिणी बनून आलेले होते, बहुतांशी विद्यार्थी वारकरी बनून आलेले होते.
अक्षरश: पंढरी अवतरलेली दिसून येत होती.विठुरायाची पालखी सजवण्यात आलेली होती. या पालखी सोहळ्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत होता.हा सोहळा भेंडवडे गावातील भागातून विठ्ठल नामाचा गजर करत पुढे पुढे जात होता.लोकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुलीनी "विठ्ठल विठ्ठल" या गीतावर लेझीमचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते.








0 टिप्पण्या